Project Date-21 मई, 2021
सरकारच्या निरंतर केलेल्या संचार बंधीला आता दोन वर्षांहून अधिक काळ ओलांडून गेला आहे. अश्यात वैद्यकिय क्षेत्रात असलेल्यांना सोडुन बाकी सर्वांची कंबर मोड झाली आहे. अनेकांची धंदे बुडाली आहेत, लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, सुरवातीला जरी रोजीने काम करणाऱ्यांची दयनीय अवस्था झाली असली तरी आता यात एकूणच असंख्य लोकांचा समावेश झालेला आहे. कंपन्या बंद झाल्याचा व नोकरीवरून काढून टाकल्याच्या बातम्या आज रोज येत असतात. ज्यात शिक्षक, वकील, इंजिनिअर, इतर सहकारी व खाजगी नोकऱ्यांमध्ये रुजू ईत्यादिंचा समावेश आहे. एका ऑनलाईन माध्यम (The Wire) नुसार साधारणतः २३० मिलियन लोकांचा करोनामुळे दारिद्र्य रेषेखाली समाविष्ट झालेला आहे.
अश्या वेढेस मदत करणारी मंडळी पेक्षा मदत मागणारी मंडळींची संख्या अनेक पटीने मोठी आहे. अशा दयनीय परिस्थितीत अनेक लोकांकडे मदत पोहचत जरी असेल, तरी यात एक वर्ग स्वभिमानी मनाचा सुद्धा आहे. ज्यांनी जीवनात कधीच कुणाची मदत घेतलेली नसते किंवा कोणाला मदत मागणे म्हणजे त्यांचेवर बोझ बनणे किंवा कोणाला तरी उगाच त्रास देणे असे समजत असणारा वर्ग. आता संचाबंदीच्या निरांतरणाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि ह्या स्वाभिमानी लोकांची जे काही बँकेत जमा पुंजी होती ते संपुष्टात आलेली आहे. आज मदतीला हाक मारणाऱ्यालाही फारस यश मिळतांना दिसून येत नाही. त्यात मदत न मागु शकणाऱ्याचे तर आणखी हाल आहेत.
हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन ‘शब्दकृती फाउंडेशन” योगेश चिंडालीया, रश्मी चिंडालीया आणि गोविंदा ढोरके यांच्या मार्फत ह्या स्वाभिमानी लोकांचा शोध घेऊन, त्यांच्याशी संपर्क साधून, त्यांच्या समस्यांचा आढावा घेऊन, त्यांना माहिती न असता त्यांनची भेट घेण्याच्या निमित्ताने अचानक भेटून त्यांची योग्य ती मदत करण्याचा धोरण पार पाडत आहे. हे सर्व करत असतांना त्यांच्या स्वाभिमानाला कुठल्याही प्रकारचा धका लागू नये व कोणी मदत केल्याचा बोजा त्यांच्या डोकी राहू नये याची संपूर्ण काळजी घेतल्या जात आहे.