Date-14 फ़रवरी, 2021
वणी, तह. वणी, जि. यवमाळ (महाराष्ट्र)
“सतचिकित्सक प्रसारक मंडळ, यवतमाळ” यांनी “ग्रामीण मुक्ती ट्रस्ट” व “शब्दकृती फाउंडेशन” च्या मदतीने १४/०२/२०२१ रोजी वणी येथील देह व्यापार करीत असणाऱ्या स्त्रियांना महिनाभराच्या राशन किट्स देऊन मदत केली.
कोरोनामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले सी. एम. आय. ई. चा डाटानुसार एकूण १२.२ करोड लोकांना त्यांचा रोजगार गमवावा लागला. त्यात मुख्यतर छोटे व्यापारी, स्थलांतरित मजूर व देहाडी मजूर आहेत.
कोरोनाने ज्याप्रमाणे अनेकांचा रोजगार हेरवला. त्याचा समान धका हा वणी येथील देह व्यापार करणाऱ्या स्त्रियांनाही लागला आहे आणि त्याचाच नुकसान ते आता अनेक महिन्यांपासून झेलत आहेत.
त्यासाठीच “सतचिकित्सक प्रसारक मंडळ, यवतमाळ” यांनी “ग्रामीण मुक्ती ट्रस्ट” व “शब्दकृती फाउंडेशन” च्या सहकार्याने वणी येथील देह व्यापार करीत असणाऱ्या स्त्रियांना महिनाभराच्या रेशन किट्स देऊन मदत केली.
आजच्या कठीण परिस्थितीत इतर कोणत्याही गोष्टींची पर्वा न करता मानव सेवा हाच आपला खरा धर्म अशी समजूत ठेवून “सतचिकित्सक प्रसारक मंडळ, यवतमाळ” यांनी “ग्रामीण मुक्ती ट्रस्ट” व “शब्दकृती फाउंडेशन” च्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात “सतचिकित्सक प्रसारक मंडळ, यवतमाळ” चे अध्यक्ष मा. प्रकाशजी नांदुरकर व त्यांच्या पत्नी, श्री. घंटेवार व त्यांच्या पत्नी व “ग्रामीण मुक्ती ट्रस्ट” चे मोहनजी उइके. त्याचप्रमणें “शब्दकृती फाउंडेशन” चे डायरेक्टर योगेश चिंडालीया हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. प्रकाशजी नंदुरकर साहेब यांनी भूषवले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बोबडे सर यांनी केले.