महिला सशक्तीकरण….(झरी)

Project Date-०९/११/२०२१

प्राचीन भारतात सिंधू घाटी सभ्यातेत महिलेला समाजात महत्वपूर्ण स्थान असायचा. त्यांना आदर आणि सन्मानाने वागणूक दिल्या जायची. महाभारत काळात महिला ऋषी असायच्या व उच्च पदस्थ म्हणून त्यांची नेमणूक व्हायची. प्रशासन व राजकारणात त्यांचा मोठा वाटा असायचा. समान सन्मान आज संविधानामुळे महिलेला मिळतो आहे.

महिला सशक्तीकरण व त्यांच्या सन्मानाच्या उद्देशाने ‘शब्दकृती फाऊंडेशन’ हे मागील २ वर्षांपासून कार्यरत आहे. शब्दकृती फाऊंडेशन ने महिलांकरिता रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने दिनांक १०/१०/२०२१ रोजी वणी, तह. वणी, जि. यवतमाळ इथे फुलांच्या हार विकत घेण्यापासून तर ते बाजारात नेऊन विकण्यापर्यंतचे प्रशिक्षणासाठी ‘वर्क शॉप’ आयोजित केले होते त्याचाच अविभिन्न भाग म्हणून अगरबत्ती प्रशिक्षण ‘वर्क शॉप’ दिनांक ०९/११/२०२१ रोजी झरी, तह. व जि. यवतमाळ येथे आयोजीत करण्यात आला. “सत्य साई परफ्युमर्स” च्या टीमने त्याचप्रमाणे शब्दकृती फाऊंडेशनचे डायरेक्ट सौ. रश्मि चिंडालिया यांनी महिलांना प्रशिक्षण दिले. त्यात अनेक महिलांनी सहभाग घेतला.

करोना सारख्या महामारिने अनेकांचा रोजगार हिरवल्या गेला. अशा कठीण परिस्थितीत त्यांना रोजगार निर्मिती करून देणे हा आपला सामाजिक कर्तव्य आहे. अशी भूमिका ‘शब्दकृती फाऊंडेशन’ चे एम. डी. ऍड. योगेश चिंडालिया यांनी मांडली. फुलांचे हार व अगरबत्ती नंतर आपण मेणबत्ती प्रशिक्षणाचे सुध्दा ‘वर्क शॉप’ आयोजित करू असे आश्वासन त्यांनी दिले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद सामाजिक कार्यकर्ते ऍड. आशिष मुंधडा यांनी भूषवले. त्याचप्रमाणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऍड. गोविंदा ढोरके व राहुल खामनकर हे उपस्थित होते.