क्षण सुखाचे……A Home Recreation project.

Project Date-२६ डिसेंबर २०२०

एक पाऊल माणुसकीचा

संविधान जरी माणसाला माणूस म्हणून जगण्याची परवानगी देत असेल, तरी निसर्गाशी झुंज अटळ……

महाराष्ट्र, जिल्हा यवतमाळ, तहसील मरेगाव, २६ डिसेंबर २०२०

श्रीमती, जनाबाई ह्या गावाराडा येथील रहिवासी आहेत. त्यांना ३ मूल, १ मुलगा व २ मुली. लग्नानंतर पतीच्या मारहाणीला त्रासून त्यांनी पतीला सोडून गावारडा येथे राहण्याचे ठरविले. मागल्या कित्येक वर्षांपासन त्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांची सोय त्यांच्याकडे नाही किव्हा ती करण्यासाठी कोणताही काम वा धंदा नाही. एका ५X१० च्या झोपड्यात त्यांचे राहणे ज्यात मूलभूत गरजांच्या नावाखाली काहीही नाही, ऋतु चक्रातून स्वतःचा बचाव करण्यासाठी गरजेच्या वस्तू नाहीत, दिलेल्या शिल्या अनावर त्यांचे जगणे. संपूर्ण आयुष्य संकटात काढत असताना किमान ४-५ वर्षां आधी आणखी एक दुर्दैवी अपघात घडतो आणि त्यात जनाबाईंचे चालणे फिरणे कायमचे बंद पडते…….

जन्मभर निसर्गाशी आणि संकटाशी झुंज देत आलेली जनाबाई आता अपघातामुळे चालू फिरू शकत नाही आणि तेव्हा पासून नाही त्यांची कोणी नियमित अंघोळ घातली अथवा त्यांना साफ केले……जनाबईची ही कथा शब्दकृती फाऊंडेशन ला अचूक माहिती होती शिवाय अश्याच लोकांना मदतीचा हात देण्याकरिता शब्दकृतीचा जन्म झाला……

दिनांक २६ डिसेंबर २०२० रोजी श्री. योगेश मंगलचंद चिंदलिया संचालक शब्दकृती फाऊंडेशन हे आपल्या टीम सोबत गावाराडा येथे पोहचले जनाबाईला संपूर्ण मूलभूत गरजांची पूर्तता करून दिली. हे बघून गावातील लोकांनीही साफ – सफाई करण्यास आवश्यक उपकरणाची मदत केली………

संविधानाने जरी माणसाला माणूस म्हणून जगण्यास परवानगी दिली, तरीही निसर्गाशी झुंज देत असताना माणसाला एक सामाजिक प्राणी म्हणून समाजाची गरज भासते अश्यावेळी आपण माणूस म्हणून तो मदतीचा हात पसरला पाहिजे अशी शब्दकृतीची धारणा आहे……